T20 विश्वचषक 2024 चा 25 वा सामना बुधवारी भारत आणि अमेरिका यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर तिसरा सामना खेळताना दिसणार आहेत. सलग दोन सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे.
भारत आणि अमेरिका यांच्यातील T20 विश्वचषक 2024 चा सामना बुधवार, 12 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता होणार आहे. नाणेफेक संध्याकाळी 7.30 वाजता होईल.
दोन्ही संघातील संभाव्य 11 खेळाडू
भारत: रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
यूएसए: स्टीव्हन टेलर, मोनांक पटेल, अँड्रिज गौस, आरोन जोन्स, नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, जसदीप सिंग, नोस्तुश केन्झिगे, सौरभ नेत्रावलकर, अली खान.