Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs WI: मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत भारताने दुसरा सामना 44 धावांनी जिंकला

IND vs WI: मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेत भारताने दुसरा सामना 44 धावांनी जिंकला
, बुधवार, 9 फेब्रुवारी 2022 (22:13 IST)
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने नेत्रदीपक खेळात वेस्ट इंडिजचा 44 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. भारताच्या 238 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या संघ 46 षटकात 193 धावांवर आटोपला. भारताकडून सूर्यकुमार यादवने 64 धावा केल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने चार बळी घेतले.
 
प्रथम फलंदाझी करताना टीम इंडियाने 237 धाव्या केला. वेस्ट इंडियाचे फलंदाज मोठी भागीदारी करू शकले नाही आणि ते 193 धावांवर बाद झाले.  
 
लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात खराब झाली. प्रसिद्ध कृष्णाने एकामागून एक धक्के देत पाहुण्या संघाची आघाडी उद्ध्वस्त केली. 76 धावांवर वेस्ट इंडिजने पाच विकेट गमावल्या. शामर ब्रुक्स (44), अकील होसेन (34) आणि ओडिन स्मिथ (24) यांनी थोडा संघर्ष करून टक्कर देण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना फारसे काही करता आले नाही आणि संपूर्ण संघ 46 षटकांत 193 धावांत सर्वबाद झाला. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 9 षटकांत 12 धावा देत 4 बळी घेतले. 
 
भारताने 50 षटकात 9 बाद 237 अशी धावसंख्या उभारली आणि  उत्तम गोलंदाजी करत विंडीजला 46 षटकात 193 धावात गुंडाळले. 
 
वेस्टइंडीज संघा विरुद्ध भारताचा हा सलग 11 एकदिवसीय मालिका विजय आहे. या मालिकेनंतर भारत दौऱ्यावर जाणारी श्रीलंकेविरुद्धची वनडे मालिकाही भारताने जिंकली आहे. 
 
तर वेस्टइंडीजचा हा वर्षातील दुसरा एकदिवसीय मालिका पराभव आहे. या आधी आयर्लन्ड ने त्यांच्या घरच्या मैदानावर 1-2 असा पराभव केला. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Googleवर मुली रात्रंदिवस काय शोधतात?