शाई होपने रविवारी त्रिनिदाद येथे भारताविरुद्ध 100 वा एकदिवसीय सामना खेळला. होपने आपल्या 100व्या एकदिवसीय सामन्यात शानदार शतक झळकावले आहे. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील 13 वे शतक आहे. याशिवाय भारताविरुद्ध तिसऱ्यांदा 100 हून अधिक धावा केल्या आहेत. 100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा होप जगातील 10वा फलंदाज ठरला आहे.
100व्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा तो वेस्ट इंडिजचा चौथा फलंदाज आहे. 16 वर्षांनंतर विंडीजसाठी कोणत्याही खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही. रामनरेश सरवन यांनी शेवटच्या वेळी 2006 मध्ये ही कामगिरी केली होती. सरवनच्या आधी स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने 2004 मध्ये 100व्या एकदिवसीय सामन्यात आणि 1988 मध्ये गॉर्डन ग्रीनिजने शतक झळकावले होते. अशी कामगिरी करणारा ग्रीनिज हा जगातील पहिला फलंदाज होता.
शतक झळकावून होप डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन यांच्या खास क्लबमध्ये सामील झाला. धवन आणि वॉर्नरने 100व्या वनडेतही शतके झळकावली आहेत. होपच्या आधी धवननेच हे केले होते. भारताकडून चार वेळा एका खेळाडूने शंभराव्या वनडेत शतक झळकावले.विंडीजकडून शाई होपने 115 धावा केल्या. त्याने त्याच्या 100 व्या वनडेमध्ये शतक झळकावले. अशी कामगिरी करणारा तो वेस्ट इंडिजचा चौथा आणि जगातील 10वा फलंदाज आहे. होपने 135 चेंडूंच्या खेळीत आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले.