Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND W vs ENG W: पहिल्या T20 मध्ये इंग्लंड कडून भारताचा 38 धावांनी पराभव

IND W vs ENG W:  पहिल्या T20 मध्ये इंग्लंड कडून भारताचा 38 धावांनी पराभव
, बुधवार, 6 डिसेंबर 2023 (23:39 IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला 38 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नाणेफेक हारल्यानंतर इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गडी गमावून 197 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला सहा गडी गमावून अवघ्या 159 धावा करता आल्या. या विजयासह इंग्लंड संघाने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
 
या सामन्यात इंग्लंडकडून नॅट शिव्हरने 77 धावा केल्या आणि डॅनियल योटनेही 75 धावांचे योगदान दिले. सोफी एक्लेस्टनने बॉलसह तीन विकेट घेतल्या. भारताकडून शेफाली वर्माने 52 आणि हरमनप्रीत कौरने 26 धावा केल्या. चेंडूसह रेणुका सिंगने तीन तर श्रेयंका पाटीलने दोन गडी बाद केले.
 
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या मोबदल्यात 197 धावा केल्या. इंग्लंडकडून नॅट शिव्हरने सर्वाधिक 77 धावा केल्या. डॅनियल यॉटनेही 75 धावांचे योगदान दिले. शेवटी अॅमी जोन्सने नऊ चेंडूत 23 धावा केल्या. भारताकडून रेणुका सिंगने तीन बळी घेतले. श्रेयंका पाटीलने दोन आणि सायका इशाकने एक गडी बाद केला. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती. रेणुका सिंगने पहिल्याच षटकातच सलग दोन विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटवर आणले. यानंतर शिव्हर-यॉटने शतकी भागीदारी करत इंग्लंडचा डाव सावरला.
 
 भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील T20 मालिकेची सुरुवात मुंबईतील पहिल्या T20 सामन्याने झाली. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सायका इशाक आणि श्रेयंका पाटील या दोन खेळाडूंनी भारताकडून पदार्पण केले. इंग्लंडचा महिला संघ भारत दौऱ्यावर तीन टी-२० आणि एक कसोटी सामना खेळणार आहे.
 
दोन्ही संघातील 11 खेळाडू
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), श्रेयंका पाटील, कनिका आहुजा, पूजा वस्त्राकर, रेणुका ठाकूर सिंग, सायका इशाक.
 
इंग्लंड : डॅनिएल व्याट, सोफिया डंकले, अॅलिस कॅप्सी, नॅट सायव्हर-ब्रंट, हेदर नाइट (सी), एमी जोन्स (विकेटकीपर), फ्रेया केम्प, सोफी एक्लेस्टोन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माहिका गौर.

Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

निमिषा प्रिया : येमेनमध्ये भारतीय नर्सला झाली फाशीची शिक्षा, जीव वाचवण्याचा त्यांच्याकडे एकमेव मार्ग शिल्लक