भारताचे सर्वात वयोवृद्ध कसोटी क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. भारताचे माजी सलामीवीर आणि राष्ट्रीय प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. ते 95 वर्षांचे होते.
एका कौटुंबिक सूत्राने सांगितले की, ते गेल्या 12 दिवसांपासून बडोद्यातील एका रुग्णालयाच्या ICU (इंटेसिव्ह केअर युनिट) मध्ये जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1952 ते 1961 दरम्यान त्यांनी भारतासाठी 11 कसोटी सामने खेळले. 1959 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांनी राष्ट्रीय संघाचे नेतृत्वही केले होते.
बडोद्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाने 1952 मध्ये लीड्स येथे इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते आणि त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 1961 मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध होता. दत्ताजीराव यांनी 1947 ते 1961 या कालावधीत रणजी करंडक स्पर्धेत बडोद्याचे प्रतिनिधित्व केले. त्याने 47.56 च्या सरासरीने 3139 धावा केल्या ज्यात 14 शतकांचा समावेश आहे. दत्ताजी हे
2016 मध्ये सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरले.
1959-60 च्या मोसमात दत्ताजींची महाराष्ट्राविरुद्ध नाबाद 249 धावांची सर्वोच्च धावसंख्या होती. 2016 मध्ये तो भारताचा सर्वात वयस्कर कसोटी क्रिकेटपटू ठरले. त्यांच्या आधी दीपक शोधन हे भारताचे सर्वात वयस्कर कसोटीपटू होते. माजी फलंदाज शोधन यांचे वयाच्या 87 व्या वर्षी अहमदाबाद येथे निधन झाले.