चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारतीय संघाने आयसीसी वन-डे क्रमवारीत तिसऱ्या स्थानी कायम आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला मागे टाकत आपल्या क्रमावारीत सुधारणा केली होती. मात्र, अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्याने भारत तिसऱ्या स्थानी कायम आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारतीय संघाच्या क्रमवारीत एक स्थानाचा फायदा झाला आहे. सध्या भारत 118 गुणांसह रॅकिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेला चॅम्पियन्स स्पर्धेत चांगले प्रदर्शन करता आले नसले तरी ते पहिल्या क्रमांकावर आहेत.
117 गुणांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी आहे. तर सध्या उत्कृष्ट कामगिरी करणारा इंग्लंडला संघ 113 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडने बांग्लादेशला मात देऊन स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखविला होता. ते सध्या 111 गुणांसह पाचव्या, तर बांगलादेश 94 गुणांसह सहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पाकिस्तान, श्रीलंका आणि वेस्टइंडिज यांचा अनुक्रमे सातवा, आठवा आणि दहावा क्रमांक आहे.