Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टीम इंडियाने बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली

टीम इंडियाने बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली
धर्मशाला कसोटीत टीम इंडिया जिंकली आहे. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिका जिंकली असून बोर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. रहाणेच्या वेगावन फलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियाचं 106 धावांचं आव्हान तुटपुंज ठरलं.  रहाणेने 27 चेंडूत झटपट नाबाद 38 धावा केल्या. या खेळीत त्याने चार चौकार आणि 2 खणखणीत षटकार ठोकले. पॅट कमिन्सला सलग दोन षटकार ठोकून, रहाणेने ऑस्ट्रेलियाची हवा काढली.
 
दुसरीकडे या कसोटी मालिकेत तुफान फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर  के एल राहुलने आणखी एक नाबाद अर्धशतक झळकावलं. राहुलने 76 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. चौथ्या दिवशी भारतासमोर विजयासाठी 87 धावांचं माफक लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करताना मुरली विजय आठ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा शून्यावर बाद झाला. पण लोकेश राहुल आणि अजिंक्य रहाणेनं अभेद्य अर्धशतकी भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. राहुलनं 76 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 51 धावांची खेळी रचली. तर रहाणेनं 27 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 38 धावा फटकावल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ममता कुलकर्णीच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी