Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 23 April 2025
webdunia

फक्त 90 सेकंदात आंघोळ उरकून घ्या, भारतीय संघाला सूचना

indian cricketers team
, मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (16:18 IST)

दक्षिण आफ्रिका दौ-यावर असणा-या भारतीय क्रिकेट संघाला दुष्काळाचा फटका बसला आहे. भारतीय संघाला  सराव केल्यानंतर किंवा सामना संपल्यानंतर फक्त 90 सेकंदात आंघोळ उरकून घ्या अशी सूचना करण्यात आली आहे. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत दाखल झाल्यापासूनच पाण्याची समस्या सुरु आहे. कसोटी मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाला दोन मिनिटात आंघोळ करण्याची सूचना देण्यात आली होती. 

याआधी पाणी वाचवण्यासाठी एका व्यक्तीला दिवसाला फक्त 87 लीटर पाणी देण्याची परवनागी स्थानिक प्रशासनाने दिली होती. पण केपटाऊनमधील पाणी समस्या दिवसेंदिवस गंभीर  होत असून पाण्याचा स्तर खालावत आहे. त्यामुळे यापुढे प्रत्येक व्यक्तीला 50 लीटरपेक्षा अधिक पाणी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोदींचा आखाती देशात दौरा, रंगणार ऐतिहासिक सोहळा