ICC World Cup Squad 2019 साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर संघाची घोषणा केली गेली.
संघात कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंव्यतिरिक्त लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्यात आली आहे.
यष्टीरक्षक म्हणून ऋषभ पंत याची चर्चा होती, पण त्याच्या जागी दिनेश कार्तिक याला मिळाली. तसेच अष्टपैलू खेळाडू म्हणून विजय शंकर याला संधी मिळाले परंतू अंबाती रायडू जागा मिळाली नाही.