भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, तर चार खेळाडूंना स्टँडबाय म्हणून संघात निवडले आहे. रोहित शर्मा, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि जसप्रीत बुमराह यांना न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मायदेशातील कसोटी मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. या सर्वांचे संघात पुनरागमन झाले आहे. रवींद्र जडेजा दुखापतीमुळे संघाचा भाग नाही. याशिवाय श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी या दोघांनाही संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. अजिंक्य रहाणे हा संघाचा भाग आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
स्टँडबाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जन नागवासवाला.