Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड -19 पॉजिटिव

भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड -19 पॉजिटिव
नवी दिल्ली , मंगळवार, 30 मार्च 2021 (14:37 IST)
भारतीय महिला टी -20 संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कोविड -19 चाचणीत सकारात्मक आढळली असून, त्यानंतर ती घरात आइसोलेशनमध्ये आहे. 32 वर्षीय भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भाग होणार होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात दुखापतीनंतर तिला टी -20 मालिकेतून वगळण्यात आले. तिच्या जागी स्मृती मंधाना टी -20 संघाची  कर्णधार झाली. आता बातमी येत आहे की हरमनप्रीत कौरला कोरोना (Covid-19 Positive) झाला आहे.
 
स्पोर्ट्सकिडाच्या अहवालानुसार, आरोग्य विभागाला अशी माहिती मिळाली आहे की हरमनप्रीत कौरमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे आढळली आहेत आणि ती आपल्या घरी आइसोलेशनमध्ये  आहे. त्याआधी सोमवारी भारतीय क्रिकेट संघाचे माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनी आपल्या कोविड -19 सकारात्मकबद्दल माहिती दिली. इरफानच्या आधी युसुफ पठाण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची बातमीही मिळाली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राष्ट्रवादीकडून लॉकडाऊनला विरोध