Publish Date: Mon, 23 Oct 2017 (10:51 IST)
Updated Date: Mon, 23 Oct 2017 (10:54 IST)
क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर विराट कोहली-महेंद्र सिंग धोनी यांची मैत्री सर्वश्रुत आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या वन-डे सीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये विराट आणि धोनीच्या मैत्रीचा एक नजारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला.
यावेळी न्यूझीलंड विरोधात बॅटिंगसाठी मैदानात उतरेल्या महेंद्रसिंग धोनी याच्या डोळ्यात अचानक कचरा गेला. त्यानंतर तो कचरा डोळ्यातून काढण्यासाठी क्रिजवर उपस्थित असलेला विराट कोहली पूढे सरसावला. विराट कोहली धोनीजवळ गेला आणि त्याच्या डोळ्यात फूंकर मारत कचरा काढला. दोन्ही क्रिकेटर्समधील हे मित्रप्रेम कॅमेऱ्यातही कैद झालं. बीसीसीआयने हा व्हिडिओ आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.