Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयपीएल 2021 लिलाव : मोठ्या क्रिकेटपटूंच्या नावाचा समावेश असून 1 हजार 97 खेळाडूंवर लागणार बोली

आयपीएल 2021 लिलाव : मोठ्या क्रिकेटपटूंच्या नावाचा समावेश असून 1 हजार 97 खेळाडूंवर लागणार बोली
नवी दिल्ली , शनिवार, 6 फेब्रुवारी 2021 (10:38 IST)
आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी 18 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या वर्षी होणार्या लिलावात एकूण 1 हजार 97 खेळाडू सामील होणार आहेत. याबाबतची माहिती आयपीएलने आपल्या अधिकृत टि्वटर हँडलवर दिली आहे. बीसीसीयआने नुकतेच स्पष्ट केले आहे की, आयपीएलचा यंदाचा हंगाम कोणत्याही परिस्थितीत भारतात होण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले जातील. कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये खेळविण्यात आला होता.
 
आयपीएलच्या या लिलावामध्ये एरॉन फिंच, मिचेल स्टार्क, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॉक्सवेल, ख्रिस मॉरीससारख्या मोठ्या खेळाडूंची नावे सामील आहेत. स्मिथवर सर्वांची नजर असणार आहे. स्मिथलला लिलावापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या संघाने मुक्त करताना संजू सॅमसनला आपल्या संघाचा नवा कर्णधार नियुक्त केले होते. फिंचलाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने यंदाच्या वर्षी आपल्या संघातून मुक्त केले होते. तर आयपीएल 2020च्या सत्रात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खराब कामगिरी करणार्याआ  मॅक्सवेलवरही लिलावात बोली लागण्याची शक्यता आहे.
 
मॅक्सवेलने आयपीएलनंतर भारताविरुध्दच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत खूप धावा केल्या होत्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मेरी कोम राज्यसभेतील अधिवेशनाला उपस्थित राहणार नाही