Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IPL 2023 Auction : हैदराबादने इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला 13.25 कोटींमध्ये विकत घेतले, विल्यमसन गुजरातमध्ये

harry brook
, शुक्रवार, 23 डिसेंबर 2022 (21:30 IST)
IPL 2023 साठी खेळाडूंचा लिलाव आज कोची येथे सुरू झाला आहे. या मिनी लिलावात सर्व फ्रँचायझी काही खेळाडू विकत घेऊन आपला संघ सुधारण्याचा प्रयत्न करतील. या लिलावात एकूण 405 खेळाडू सहभागी होणार आहेत. यापैकी २७३ भारतीय खेळाडू आहेत.
 
इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकसाठी फ्रँचायझींमध्ये चुरशीची लढत आहे. सुरुवातीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बोली लावली. यानंतर आरसीबीने नाव मागे घेतले. त्यानंतर राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात लढत झाली. नंतर राजस्थानने हे नाव मागे घेतले. अशाप्रकारे सनरायझर्स हैदराबादने हॅरी ब्रूकला १३.२५ कोटी रुपयांना खरेदी केले. तो या आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात महागडा खेळाडू आहे.
 
केन विल्यमसनला गुजरात टायटन्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. विल्यमसनला विकत घेत गुजरातने आपला संघ आणखी मजबूत केला आहे. सनरायझर्स हैदराबादने यावर्षी विल्यमसनला सोडले. गुजरातचा संघ गतविजेता आहे.
 
405 खेळाडूंचे भवितव्य पणाला लागले आहे. लिलाव सुरू झाला आहे. आता कोणाचे नशीब चमकते हे पाहावे लागेल.
 
Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तु फुकट सरपंच झाली” असे म्हणत १४ ते १५ जणांनी घरात घुसून महिला सरपंचाला बेदम मारहाण