Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत पाणीपुरी विकणारा बनला कोट्यधीश

मुंबईत पाणीपुरी विकणारा बनला कोट्यधीश
नवी दिल्ली , शुक्रवार, 20 डिसेंबर 2019 (12:59 IST)
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील वर्षी होणार्‍या हंगामासाठी यशस्वी जास्वालला राजस्थान रॉयल्सने तब्बल 2.4 कोटी रुपयांना खरेदी केले. संघर्ष करून यश मिळवणार्‍या खेळाडूंमध्ये यशस्वी जायस्वालचा समावेश होतो. यशस्वी सध्या भारतीय अंडर 19 संघात सलामीवीर म्हणून खेळतो. तसेच तो अंडर 19 वर्ल्डकपच्या संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. आज यशस्वी जायस्वालवर अडीच कोटींची बोली लागली असली तरी यशस्वीने एके काळी मुंबईतील आझाद मैदानात पाणीपुरी विकण्याचे काम केलेले आहे. स्वतःचा खर्च स्वतः करण्यासाठी शस्वीने हे काम सुरू केले होते.
 
तो म्हणाला, पाणीपुरी विकताना मला आजीबात चांगले वाटत नव्हते. कारण, ज्या मुलांसोबत मी क्रिकेट खेळायचो, ते सकाळी माझे कौतुक करायचे. परंतु, सायंकाळी तेच मझ्याकडे पाणीपुरी खायला येत असत. त्यामुळे मला फार वाईट वाटत होते. परंतु, हे सर्व मला गरजेपोटी करावे लागत असत. यशस्वी 13 वर्षाचा असताना 2013 साली मुंबईत आला होता. उत्तर प्रदेशच्या भदोही जिल्ह्यातील तो रहिवासी आहे. गेल्यावर्षी भारताच्या अंडर 19 संघाने श्रीलंकेचा 144 धावांनी पराभव करून सहावंदा आशिया कप आपल्या नावावर केला होता. या मालिकेत अनेक खेळाडूंनी चांगला खेळ केला होता. त्यात यशस्वीचाही समावेश होता. संघाचा सलामीवीर असलेल्या यशस्वीने फायनल सामन्यात 85 धावा काढल्या होत्या. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सलमानला मागे टाकत कोहलीने केली 'विराट' कमाई