Publish Date: Tue, 28 Mar 2017 (11:04 IST)
Updated Date: Tue, 28 Mar 2017 (11:06 IST)
सिडनी- धरमशाला कसोटीच्या तीन दिवसांचा खेळ झाला असला तरी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर बोचरी टीका करण्याचे ऑस्ट्रेलियन खेळाडू सोडत नसल्याचे दिसत आहे. कारण आता विराटवर तोंडसुख घेणार्या यादीत आता माजी कसोटीवर ब्रॅड हॉजची भर पडली आहे. विराटला तिसर्या कसोटीत झालेल्या खांद्याच्या दुखापतीमुळे धरमशालाच्या चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली. पण ब्रॅड हॅजचा आरोप आहे की, भारतीय कर्णधाराने आयपीएलमध्ये खेळता यावे म्हणून चौथ्या कसोटीतून विश्रांती घेतली आहे.
आयपीएलच्या बंगळुरु आणि हैदराबाद संघांमधल्या सलामीच्या आयपीएल सामन्यात विराट खेळला तर ते खूप वाईट असेल, असे भाष्यही त्याने केले. ब्रॅड हॅज हा आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाचा प्रशिक्षकही आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये बंगलोरचा कर्णधार असलेल्या विराटवर टीका करून तो आपला दुहेरी हेतू साध्य करतो आहे का? असा प्रश्न पडला आहे.