Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इरफान पठानला ट्विटरवर मिळाला सल्ला, मुलाचे नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नकोस

Irfan Pathan hit back a twitter users
नवी दिल्ली , बुधवार, 28 डिसेंबर 2016 (12:30 IST)
क्रिकेटर इरफान पठान नुकताच पिता बनला आहे. त्याची बायको सफा बेगने एका मुलाला जन्म दिला आहे. इरफाने ही बातमी     ट्विटरवर शेअर केली होती. ज्यावर त्याचे अभिनंदन करण्यात आले होते. त्याच दरम्यान एका यूजरने त्याला मुलाचे नाव दाऊद किंवा   याकूब न ठेवण्याचा सल्ला दिला आहे. यूजरने इरफानला काय म्हटले ...
- दिव्यांशु राज नावाच्या यूजरने ट्विट केले, 'वडील झाल्याबद्दल तुझे अभिनंदन इरफान पठान! पण भाई त्याचे नाव दाऊद किंवा याकूब ठेवू नको. हे जग फारच हास्यास्पद आहे.'
- इरफान 20 डिसेंबराला पिला बनला आहे.   
- सांगायचे म्हणजे दाऊद इब्राहिम मोस्ट वांटेड अंडरवर्ल्ड डॉन आहे. तो 1993च्या मुंबई बॉम्बं ब्लास्टचा आरोपीपण आहे.  
- जेव्हा की याकूब मेननला 1993च्या मुंबई बॉम्बं ब्लास्ट प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मृत्यू दंडाची शिक्षा दिली होती. त्याला फाशी देण्यात आली आहे.  
इरफानने काय उत्तर दिले?
- इरफानने आपल्या उत्तरात ट्विट केले, 'दिव्यांशु, नाव काहीही ठेवले तरी एक गोष्ट तर निश्चित आहे की तो त्याचे वडील आणि काका प्रमाणे आपल्या देशाचे नाव मोठे करेल.'
- इरफानने आपल्या एका दुसर्‍या ट्विटमध्ये हे ही सांगितले आहे की त्याने आपल्या मुलाचे नाव इमरान ठेवले आहे आणि हे नाव त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी फारच महत्त्वाचे आहे.  
- क्रिकेटरने तिसर्‍या ट्विटमध्ये म्हटले, 'चिंता दुसर्‍यांची चिता आपली...जगा आणि जगू द्या.'

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांचे निधन