इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना केंद्रीय करार यादीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा होता. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली. बोर्डाच्या सूचना असूनही दोन्ही फलंदाज देशांतर्गत स्पर्धेत खेळले नाहीत.या मुळे त्यांना कराराच्या यादीतून बाहेर केले.
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “तुम्ही संविधान पाहू शकता. मी फक्त निवड समितीची बैठक बोलावतो. तो निर्णय अजित आगरकरांचा होता. हे दोन खेळाडू देशांतर्गत क्रिकेट खेळत नसताना त्यांना बाहेर ठेवण्याचा निर्णय आगरकरचा होता. माझे काम फक्त त्याची अंमलबजावणी करणे आहे.
गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकानंतर ईशान दीर्घ विश्रांतीवर गेला होता आणि केवळ आयपीएलमध्ये परतला होता.अय्यरने मुंबईसाठी रणजी ट्रॉफीमधील उपांत्य आणि अंतिम फेरीसह काही सामने खेळले.
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर इशानशी काय संभाषण झाले असे विचारले असता ते म्हणालले , ''मी त्याला कोणताही सल्ला दिला नाही. तो चांगला खेळला पाहिजे, असा मैत्रीपूर्ण संवाद होता. मी सर्व खेळाडूंशी असे बोलतो.