rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कर्नाटकने फायनल जिंकली, विदर्भाचा 36 धावांनी पराभव करून पाचव्यांदा विजय हजारे करंडक जिंकला

cricket
, रविवार, 19 जानेवारी 2025 (10:33 IST)
कर्नाटकच्या विजयासह विजय हजारे करंडक स्पर्धेची सध्याची आवृत्ती संपली. शनिवारी वडोदरा येथे झालेल्या अंतिम सामन्यात कर्नाटकने विदर्भाचा 36 धावांनी पराभव करत पुन्हा एकदा विजेतेपदावर नाव कोरले. कर्नाटकचे हे पाचवे विजेतेपद आहे. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा झाली.

रविचंद्रन स्मरणच्या शतकी खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजीला आलेल्या कर्नाटकने 50 षटकांत 6 बाद 348 धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्नाटकचा संघ 48.2 षटकांत 312 धावांवर गारद झाला. त्यांच्याकडून ध्रुव शौरीने 111 चेंडूत 110 धावा केल्या. या सामन्यात कर्नाटककडून वासुकी कौशिक, प्रसिध कृष्णा आणि अभिलाष शेट्टी यांनी प्रत्येकी तीन तर हार्दिक राजला एक विकेट मिळाली.
 
कर्नाटकने विदर्भाचा पराभव करून पाचव्यांदा विजेतेपदावर कब्जा केला . यापूर्वी, संघाने 2013-14, 2014-15, 2017-18, 2019-20 आवृत्त्यांमध्ये ट्रॉफी जिंकली होती. त्याचवेळी विदर्भाचे पुन्हा एकदा पहिले विजेतेपद हुकले.
 
लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भाच्या डावाला सुरुवात झाली, विदर्भाकडून ध्रुव शोरेने शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे तिसरे शतक आहे. मात्र, अंतिम फेरीत त्याला दुसऱ्या टोकाकडून चांगली साथ मिळाली नाही.

या सामन्यात शौरीशिवाय हर्ष दुबेने मोठी खेळी केली. त्याने 30 चेंडूत 63 धावा केल्या. करुण नायर (27) बाद झाल्यानंतर विदर्भाची मधली फळी दडपणाखाली आली. विदर्भाचा संघ एकही सामना न गमावता अंतिम फेरीत पोहोचला होता आणि या स्पर्धेत आघाडीच्या फळीतील फलंदाजांच्या मोठ्या खेळीमुळे मधल्या फळीला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. अंतिम सामन्याच्या दबावाखाली त्याची फलंदाजी विस्कळीत झाली.

शॉरीने एका टोकाकडून काही शानदार चौकार मारले आणि नायरसह 56 धावांची आणि अनुभवी जितेश शर्मा (34) सोबत 62 धावांची भागीदारी केली. मात्र, मधल्या षटकांमध्ये विदर्भ संघाला अनेक चौकार लगावता आले नाही, त्यामुळे दडपण वाढले.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: राज्याच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर