Publish Date: Fri, 22 Sep 2017 (10:59 IST)
Updated Date: Fri, 22 Sep 2017 (11:02 IST)
भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर लोटांगण घातले आहे. तेहत्तीसावे षटक फेकणारा कुलदिप यादवने केवळ तीन चेंडूत या सामन्याचा रंग बदलून टाकला आहे. षटकाच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर त्याने ऑस्ट्रेलियाचे तीन गडी बाद करत हॅट्रिक केली आणि अख्खे मैदान त्याचासाठी उभे राहिले.