मितालीप्रमाणे मलाही संघाबाहेर काढले होते

मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (12:30 IST)
भारतीय महिला क्रिकेटमधील सर्वांत वरिष्ठ खेळाडू असलेल्या मिताली राजला इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यातून अचानक वगळल्याचे टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला अजिबात आश्चर्य वाटला नाही. 
 
करिअरमध्ये ऐनभरात असताना मलाही असेच संघाबाहेर काढण्यात आले होते, असे त्याने म्हटले आहे. मिताली राजने पाकिस्तान आणि आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. तरीही तिला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली. त्यानंतरच्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही मिताली अंतिम 11 मध्ये स्थान मिळाले नाही. हा सामना भारताने 8 गड्यांनी गमावला होता. भारताचे नेतृत्व केल्यानंतर मलाही डगआऊटमध्ये बसावे लागले होते, असे गांगुली म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अबकी बार आंबेडकर की सरकार असे कोण म्हणाले