Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठमोळ्या अष्टपैलू खेळाडू केदार जाधव ने क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली

kedar jadhav
, सोमवार, 3 जून 2024 (16:13 IST)
social media
एकीकडे टीम इंडिया T20 World Cup 2024 खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज असताना, दुसरीकडे आज एका खेळाडूने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे. 
केदार जाधवने त्याच्या निवृत्तीबाबत आपल्या इंस्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली आहे ती टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीशी मिळतीजुळती आहे. धोनीने निवृत्तीच्या वेळीही अशीच एक नोट शेअर केली होती. केदारने त्याच्या कारकिर्दीतील काही छायाचित्रे देखील शेअर केली आहेत ज्यात किशोर कुमारचे गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजत आहे. केदारने दुपारी तीनच्या सुमारास निवृत्ती जाहीर केली. यादरम्यान केदार जाधवने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.
 
केदारच्या कारकिर्दी बद्दल बोलायचे तर केदार जाधवने टीम इंडियासाठी 73 वनडे आणि 9 टी-20 सामने खेळले आहेत. केदारने 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 1389 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याने 2 शतके आणि 6 अर्धशतके झळकावली. याशिवाय 9 टी-20 सामन्यात 122 धावा केल्या. ज्यात त्याने आपल्या बॅटने अर्धशतक झळकावले. केदारने आयपीएलचे 95​​सामनेही खेळले आहेत. केदारने आयपीएलमध्ये1208 धावा केल्या होत्या. आयपीएलमध्ये त्याने आपल्या बॅटने 4 अर्धशतकेही झळकावली.केदारने भावुक करणारी पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानत क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. 
 

Edited by - Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उष्णतेची लाटः 3 दिवसांत उष्माघातामुळे 50 हून अधिक मृत्यू, यावर्षी भारतात इतके गरम का होत आहे? वाचा