Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठा खुलासा केला

मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकाबाबत मोठा खुलासा केला
, मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (16:29 IST)
मोहम्मद शमी सध्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. मात्र, लवकरच त्याचे पुनरागमन अपेक्षित आहे. मोहम्मद शमीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. जिथे त्याने टीम इंडियाला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

मात्र भारतीय संघ अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान, मोहम्मद शमी पहिल्या काही सामन्यांमध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 चा भाग नव्हता. मात्र, विश्वचषकात बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला दुखापत झाली आणि त्यानंतर त्याच्या जागी मोहम्मद शमीचा प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला. 

विश्वचषकाच्या दरम्यान शमीच्या घोट्याला दुखापत झाली तरीही तो स्पर्धेत खेळले .या दुखापतीमुळे तो सध्या क्रिकेटपासून दूर असून त्याच्या पुनर्वसनावर काम करत आहे. 

शमीने गेल्या महिन्यांत झालेल्या सीएट पुरस्कारा दरम्यान त्याच्या विश्वचषकाच्या प्रवासाबद्दल सांगितले. शमी म्हणाले की , तीनही एकदिवसीय विश्वचषकात (2015, 2019 आणि 2023 मध्येतो प्रथम पसंतीचे खेळाडू नव्हते. मात्र निवड झाल्यावर त्याने दमदार कामगिरी केली आणि संधीच सोनं केलं. 

मला जेव्हा संधी मिळाली त्या साठी मी देवाचे आभार मानतो. माझ्या कामगिरीने मला संघातून वगळण्याचा विचार केला नाही.आपण मेहनत केली पाहिजे. जेव्हा तुम्ही तयार असता तेव्हा स्वतःला इतरांच्या समोर आणता. संधीच सोनं कस करायचं हे प्रत्येकाने ठरवावे. 
Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पालघरच्या नदीत सापडला हात आणि पायाला दगड बांधलेला महिलेचा मृतदेह