Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील होणार

मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघात सामील होणार
, रविवार, 17 नोव्हेंबर 2024 (11:51 IST)
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघात सामील होणार आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शमीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता, मात्र नुकत्याच झालेल्या रणजी स्पर्धेत या वेगवान गोलंदाजाने चमकदार कामगिरी केली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार शमी दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघात नक्कीच सामील होईल. 
 
गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यापासून तो भारतीय संघाबाहेर होता. या स्पर्धेदरम्यान त्याला दुखापत झाली होती त्यानंतर या वर्षाच्या सुरुवातीला त्याच्या घोट्यावर शस्त्रक्रिया झाली होती. 
 
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये खेळवला जाणार आहे. यासाठी रोहित शर्मा वगळता संघातील इतर सर्व सदस्य ऑस्ट्रेलियाला पोहोचले असून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेनंतर शमी भारतीय संघात पुनरागमन करेल, असे मानले जात होते, पण संघ जाहीर झाला तेव्हा त्याच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र, शमी ज्या पद्धतीने मैदानात परतला आहे, त्यावरून निवडकर्ते प्रभावित झाले आहेत. शमी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला तर भारतासाठी दिलासादायक ठरेल.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: अमरावतीमध्ये नवनीत राणा यांच्यावर रॅलीदरम्यान हल्ला