रुवारी, लेजेंड्स लीग क्रिकेट 2022 च्या उपांत्य फेरीत, इंडिया लिजेंड्स आणि ऑस्ट्रेलिया लीजेंड्स यांच्यात सामना झाला. नमन ओझा आणि इरफान पठाण यांच्या चमकदार कामगिरीमुळे, इंडिया लिजेंड्सने विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज बेन डंकने अभिमन्यू मिथुनचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला आणि पॉइंटवर उभ्या असलेल्या सुरेश रैनाने अप्रतिम झेल घेतला. या झेलनंतर रैनाचे खूप कौतुक झाले आणि अनेक चाहत्यांनी त्याला किमान आयपीएलमध्ये तरी खेळायला सांगितले.
यादरम्यान भारतीय संघाचा लेगस्पिनर अमित मिश्राने रैनाच्या झेलचे कौतुक केले आणि ट्विटरवर पोस्ट देखील केले. त्या कमेंटमध्ये एका यूजरने अमित मिश्राला त्याच्या मैत्रिणीला फिरायला घेऊन जाण्यासाठी 300 रुपये मागितले, ज्याच्या उत्तरात मिश्राने 500 पाठवून स्क्रीनशॉट शेअर केला. मिश्रा यांनी लिहिले, "पैसे पाठवले आहेत, तुमच्या डेटसाठी शुभेच्छा." यानंतर अमित मिश्रा यांच्याकडे पैसे मागणाऱ्यांची रांग लागली होती.