Publish Date: Fri, 06 Aug 2021 (18:00 IST)
Updated Date: Fri, 06 Aug 2021 (18:03 IST)
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) ला ट्विटरवर त्याची निळी टिक परत मिळाली आहे. काही काळापूर्वी धोनीच्या अधिकृत ट्विटर खात्याची निळी टिक काढून टाकण्यात आली होती. तो बराच काळ ट्विटरवर सक्रिय नसल्याचे सांगण्यात येत होते. यामुळे, त्याची निळी टिक काढून टाकण्यात आली आहे, परंतु आता त्याला पुन्हा ट्विटरवरून निळी टिक मिळाली आहे. मात्र, या प्रकरणी अद्याप ट्विटरकडून कोणतेही निवेदन जारी करण्यात आलेले नाही.