Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

PAK vs SL:  पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला
, बुधवार, 27 नोव्हेंबर 2024 (18:23 IST)
इस्लामाबाद, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शने दरम्यान, श्रीलंका अ संघाने मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे. आता संघ पाकिस्तान शाहीन विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेतील शेवटचे दोन सामने खेळणार नाही. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याला दुजोरा दिला आहे. श्रीलंका क्रिकेटशी झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोर्डाने म्हटले आहे. 
 
पाकिस्तान शाहीन आणि श्रीलंका अ यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला आहे. सोमवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने १०८ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यात श्रीलंकेने 50 षटकात 7 विकेट गमावत 306 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ 198 धावांवर ऑलआऊट झाला होता. अशाप्रकारे यजमानांनी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
 
या मालिकेतील शेवटचे दोन सामने बुधवार आणि शुक्रवारी रावळपिंडीत होणार होते . मात्र, पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या राजकीय विरोधामुळे दोन्ही मंडळांनी हे सामने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पीसीबीने सांगितले की, नवीन तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार