Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pakistan vs England Final : इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करून दुसऱ्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले

Pakistan vs England Final  : इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करून दुसऱ्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले
, रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (17:27 IST)
बेन स्टोक्सच्या लढाऊ खेळीच्या जोरावर इंग्लंडने T20 विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावले.इंग्लंडचे हे दुसरे टी-20 विश्वचषक विजेतेपद आहे, त्याआधी त्यांनी 2010 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने इंग्लंडसमोर 138 धावांचे लक्ष्य ठेवले होते.बेन स्टोक्सच्या नाबाद 52 धावांच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने 6 चेंडू शिल्लक असताना ही धावसंख्या जिंकली.बेन स्टोक्सने 19व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक धाव घेत इंग्लंडला विजेतेपद मिळवून दिले.
 
इंग्लंड टी-20 विश्वचषकाचा नवा चॅम्पियन आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडने पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव करत हे विजेतेपद पटकावले. इंग्लंडला दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. इंग्लंडशिवाय वेस्ट इंडिजच्या संघाने दोनदा टी-20 विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंडने 2010 मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. पाकिस्तानने 8 गड्यांच्या मोबदल्यात 137 धावा केल्या. इंग्लंडला विजयासाठी 138 धावा करायच्या होत्या. इंग्लंड संघाने 5 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठले. 
 
138 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात चांगली झाली नाही. गेल्या सामन्याचा हिरो अॅलेक्स हेल्स आज 1 धावांच्या स्कोअरवर शाहीन आफ्रिदीचा बळी ठरला. नंतर कर्णधार जोस बटलरने काही शानदार फटके खेळले. पण तोही हरीश रौफचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला बेन स्टोक्स पुन्हा एकदा इंग्लंडसाठी खूप महत्त्वाचा ठरला. 2019 च्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला विजयी करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या बेन स्टोक्सने आजही शानदार खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दडपणाखालीही बेन स्टोक्सने विकेट राखली आणि अखेरीस संघाला विश्वविजेता बनवल्यानंतरच तो परतला. बेन स्टोक्सने 49 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकारासह 52 धावांची खेळी केली.
 
Edited By - Priya Dixit  
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुषमा अंधारेंचे विभक्तपती वैजनाथ वाघमारे यांचा शिंदे गटात प्रवेश