रविवारी भारताने कटक येथील विंडीजविरुद्धचा तिसरा आणि निर्णायक सामना चार विकेटनी जिंकला. यासोबतच टीम इंडियाने मालिका देखील 2-1 ने जिंकली.
अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात एक गंमत घडली. हा प्रसंग वेस्ट इंडिजच्या कर्णधार पोलार्ड आणि भारताच्या कर्णधार विराट कोहली यांच्यात घडला. पोलार्ड मैदाना असताना विराट कोहलीने काही तरी पुटपटत त्याला चिडवले. नंतर पोलार्डने जेव्हा चेंडू शांतपणे खेळला तेव्हा विराट म्हणाला, स्लॉग कर, डिफेंड का टाकत आहे. त्यावर पोलार्डने देखील उत्तर दिले.
तरी विराटने पुन्हा एकदा त्याला डिवचले. तेव्हा मात्र पोलार्डने हसत आणि अनपेक्षितपणे उत्तर दिले आणि ते उत्तर व्हायरल होत आहे. तो विराटला आय लव्ह यू विराट असे म्हणाला.
विराट आणि पोलार्ड यांच्यात मैदानावर झालेल्या या संवादाची चर्चा सोशल मीडियावर तसेच कॉमेट्री बॉक्समध्ये देखील झाली.