इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वन-डे चषकात नॉर्थम्प्टनशायरला मोठा धक्का बसला आहे. भारताचा स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या प्रतिभावान फलंदाजाला रविवारी गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पृथ्वीने नॉर्थहॅम्प्टनशायरसोबतच्या पहिल्या काऊंटी हंगामात अनेक विक्रम मोडीत काढले. मात्र, गेल्या आठवड्यात डरहमविरुद्धच्या वन-डे चषक सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. या संघासाठी पृथ्वीने दोन मोठ्या खेळी खेळल्या होत्या. यामध्ये सॉमरसेटविरुद्ध 244 आणि डरहॅमविरुद्ध 125 धावांचा समावेश आहे.
निवेदनानुसार, पृथ्वी शॉ इंग्लंडमध्ये होणार्या अॅक्शन-पॅक वन-डे कपमध्ये यापुढे खेळणार नाही. स्कॅन अहवालात शॉची दुखापत अपेक्षेपेक्षा जास्त गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वैद्यकीय पथक शुक्रवारी लंडनमधील तज्ज्ञांशी संपर्क साधणार आहे. नॉर्थम्प्टनशायरचे मुख्य प्रशिक्षक जॉन सॅडलर म्हणाले - पृथ्वीने आमच्यावर खूप प्रभाव पाडला आहे. या स्पर्धेतील उरलेल्या सामन्यांसाठी तो आमच्यासोबत नसणे हे अतिशय दुःखद आहे. तो अतिशय नम्र खेळाडू आहे. त्याच्याबद्दल आपल्या मनात खूप आदर आहे. त्याने नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.
भारताच्या सलामीवीराने गेल्या आठवड्यात काउंटी ग्राउंडवर सॉमरसेटविरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायरसाठी सहाव्या क्रमांकाची एकदिवसीय धावसंख्या (244 धावा) केली. एकदिवसीय चषकाच्या इतिहासात 150 पेक्षा जास्त धावसंख्या नोंदवणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला. नॉर्थम्प्टनशायरच्या 87 धावांनी सॉमरसेटवर विजय मिळवताना पृथ्वीने 153 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह विक्रमी 244 धावा केल्या. यानंतर या स्टार फलंदाजाने डरहमविरुद्ध पुन्हा एकदा शानदार शतक झळकावले. त्यानंतर त्याने 76 चेंडूत 125 धावांची खेळी केली. 23 वर्षीय पृथ्वीने आपल्या खेळीत 15 चौकार आणि 7 षटकार मारले होते.
तसेच मैदानावरील त्याच्या कामगिरीचा आमच्या ड्रेसिंग रुममध्ये मोठा प्रभाव होता,” प्रशिक्षक सॅडलर म्हणाले. त्याच्यापेक्षा कोणीही सामने जिंकण्याची आकांक्षा बाळगत नाही आणि त्याने या संघाला विजय मिळवून देण्यात मोठा हातभार लावला. आम्ही त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो आणि लवकरच तो पुन्हा धावा करताना पाहण्याची आशा करतो.