इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी राहुल चाहरला भारतीय संघात सामील केले जाण्याची शक्यता आहे. चाहर कसोटी मालिकेदरम्यान राखीव खेळाडूच्या रूपात संघासोबत जैव सुरक्षित वातावरणात होता. वरूण चक्रवर्ती व राहुल तेवतिया यांच्या तंदुरूस्तीवर अद्यापपही संशय का आहे व ते जर अनफिट राहिले तर राहुलला संघात सामील केले जाऊ शकते.
तेवतिया अहमदाबादमध्ये बाकी खेळाडूंसोबत सराव करत आहे तर चक्रवर्ती ट्रेनिंगचा भाग नाही व त्याला एनसीएमध्ये आपल्या फिटनेसवर काम करण्यास सांगण्यात आले आहे.