क्रिकेट : रवी शास्त्री हेच प्रशिक्षक होण्याची शक्यता

सोमवार, 10 जुलै 2017 (08:24 IST)
अनिल कुंबळे यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन क्रिकेट प्रशिक्षण निवडीच्या प्रक्रियेला वेगात सुरु झाली आहे. नियुक्‍त केलेल्या समितीकडे एकूण 10 जणांनी अर्ज केले आहेत. यापैकी  मुलाखतीसाठी सहा जणांना बोलविण्यात आले आहे. या सर्व नावांमध्ये रवी शास्त्रीचे नाव सर्वात आघाडीवर आहे.
 
सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण आणि सौरव गांगुली या क्रिकेट सल्लागार समितीची आज सोमवारी  बैठक होणार आहे. प्रशिक्षकासाठी रवी शास्त्री, वीरेंद्र सेहवाग, टॉम मुडी, रिचर्ड पायबस, डोडा गणेश, लालचंद राजपूत, लान्स क्‍लुझनर, राकेश शर्मा, फिल सिमन्स आणि उपेंद्र ब्रह्मचारी यांनी अर्ज केले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख हाऊ टू सेव्ह ऑफलाईन व्हिडिओ