Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 10 April 2025
webdunia

शास्त्रीकडून भारतीय संघाच्या प्रशिक्षणात बदल

ravi shastri
श्रीलंका दौऱ्यापूर्वीच भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांनी नियुक्ती करण्यात आली. या दौऱ्यावर संघाचा ताबा घेतल्यानंतर शास्त्री यांनी प्रशिक्षणाच्या शैलीत बदल केला आहेत. या बदलाचे चांगले परिणाम पहिल्याच कसोटीत दिसून आले आहेत.
 
रवी शास्त्री यांनी प्रशिक्षणात खेळाडूंसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लागू केल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मधल्या फळीतील फलंदाज तयार करणे हे होय. यात फलंदाजाच्या क्रमवारीशी काहीही संबंध नाही. शास्त्री यांनी नवीन पद्धतीची अंमलबजावणी करत मधल्या फळीत खेळविण्यापूर्वी फलंदाजांचा वार्मिंग अप घेतला जात आहे.
 
पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शिखर धवन आणि अभिनव मुकुंद हे संघातील खेळाडूंपूर्वीच गॅले मैदानावर दाखल झाले होते. यावरून हे निश्‍चित झाले होते की त्यांना प्रथम फलंदाजी करून जास्तीत जास्त धावसंख्या उभारायची होती.
पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करत धवनने पहिल्या डावात 168 चेंडूत 190 धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यानंतर सलामीचे फलंदाज बाद होईपर्यंत चेतेश्‍वर पुजार आणि विराट कोहली दोघेही नेटमध्ये सराव करत होते. शास्त्री यांनी प्रथमच केलेला हा प्रयोग यशस्वी झाल्याचे स्पष्ट होते असून खेळाडूंकडून या बदलाचे स्वागत होत आहे. प्रशिक्षक शास्त्री यांनी विश्‍वासाने केलेल्या या पैलूमुळे खेळाडूंनी तिन्ही आघाडीवर उत्कृष्ट खेळी करून दाखविली.
 
श्रीलंका दौऱ्यावर जाण्यापूर्वी रवी शास्त्री यांना संघासोबत जास्त वेळ मिळाला नव्हता. त्यामुळे श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर शास्त्रींनी थोड्याच कालावधीत खेळाडूंशी संवाद साधला आणि खेळाडूंनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. संघासोबत सरावावेळी शास्त्री म्हणाले की, खेळाडूंनी अन्य बाबींवर विचार करण्यापेक्षा खेळाचा आनंद लुटण्यावर लक्ष्य केंद्रीत केले पाहिजे. हेच त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.
 
दरम्यान, माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या नेतृत्त्वाखाली भारताने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चांगली कामगिरी करत कसोटीत अव्वल स्थान मिळविले. हेच अव्वल स्थान भारतीय खेळाडूंनी कायम राखावे, अशी रवी शास्त्री यांची अपेक्षा आहे. श्रींलका दौऱ्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारपासून कोलंबो येथे खेळण्यात येणार आहे. या सामन्यात विजय मिळवून तीन कसोटी सामन्यांची मालीका जिंकण्याच्या उद्देशाने खेळाडूंकडून सराव करण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवाझ शरीफ यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड आज