Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला रवींद्र जडेजा

टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला रवींद्र जडेजा
नवी दिल्ली , बुधवार, 9 ऑगस्ट 2017 (09:42 IST)
भारतीय ऑलराउंडर रवींद्र जडेजा आता टेस्टचा नंबर वन ऑलराऊंडर बनला आहे.  जडेजाच्या अगोदर बांग्लादेशचा शाकिब अल हसन नंबर एकचा ऑलराऊंडर होता. रविंद्र जडेजाकडे आता ४३८ पॉईंटस् आहेत तर शाकिबकडे ४३१ पॉईंटस. टेस्ट रँकिंगमध्येही जडेजाकडे ८९३ पॉईंटस आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जेम्स एन्डरसनकडे ८६० पॉईंस आहेत. बॉलर्सच्या रॅकिंगमध्ये जडेजा अगोदरपासूनच सर्वोच्च स्थानावर विराजमान आहे.
 
श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जडेजावर एका मॅचचा बॅन लावण्यात आला. त्यामुळे तो तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दिसणार नाही. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये जडेजा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. जडेजा नंबर वन टेस्ट ऑलराऊंडर ठरल्यानंतर ‘आमच्या तलवारबाजीच्या मास्टरचं अभिनंदन. वेल डन जड्डू’ असे म्हणत कॅप्टन विराट कोहलीने ट्विटरवरून त्याचे अभिनंदन केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Triumph आणि बजाज ऑटो सोबत पार्टनरशिप