Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

RCB vs PBKS:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव केला.

webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (15:46 IST)
IPL 2021 च्या 48 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने  पंजाब किंग्सचा सहा धावांनी पराभव केला. विजयासह विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरूनेही प्लेऑफ गाठले आहे. शारजामध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या 57 धावांच्या खेळीमुळे आरसीबीने 164 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पंजाब किंग्सला फक्त 158 धावा करता आल्या. आरसीबीकडून युझवेंद्र चहलने तीन बळी घेतले
 
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल 2021 च्या प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आरसीबीने दिवसाच्या पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जचा सहा धावांनी पराभव केला. शारजाह मैदानावर आरसीबीने प्रथम फलंदाजी आणि नंतर गोलंदाजीने पंजाबवर मात केली. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने पंजाबसमोर 165 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, चांगली सुरुवात असूनही, पंजाबचा संघ 20 षटकांत सहा गडी गमावून 158 धावाच करू शकला.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नेमबाजी: भारताने कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत 4 सुवर्णपदके जिंकून अव्वल स्थान पटकावले