Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोप उडाली नाही- रोहित

झोप उडाली नाही- रोहित
मांडीच्या दुखापतीतून सावरण्यासाठी मैदानाबाहेर गेलेले मागील चार महिने हे रोहित शर्मासाठी वेदनादायी होते. मात्र, मधल्या फळीतील स्थानासाठी अजिंक्य रहाणे आणि करूण नायर यांच्याशी आपली आता स्पर्धा असेल, या वास्तवाने कधीच झोप उडाली नाही. माझी स्पर्धा कुणाशीच नाही अशी प्रांजळ कबुली भारतीय संघात पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या रोहितने दिली.
 
माझ्या आतापर्यंतच्या कारकीर्दीत मी कधीच मला कुणाशी स्पर्धा करायची आहे, याचा विचार करण्यात वेळ दवडला नाही. तुमची विचारप्रणाली जर अशी असेल, तर खेळाडू म्हणून तुम्ही कधीच विकसित होऊ शकणार नाही. माझी स्पर्धा ही स्वत:शीच आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाळेत सुविधा आवश्यक: बबिता फोगट