रोहित शर्माला या मैदानावर बॅटिंग करायची इच्छा

गुरूवार, 20 फेब्रुवारी 2020 (12:15 IST)
भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माचे लक्ष्य आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका आणि आयपीएल आहे. दुखापतीमुळे रोहित न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला आहे. हिटमॅन रोहितने सोशल मीडियाद्वारे एक इच्छा व्यक्त केली आहे.
 
रोहितने बीसीसीआयने मोटेरा स्टेडियमच्या एरियल व्ह्यूचा फोटो रिशेअर केला. तो म्हणतो, या शानदार मैदानाबद्दल खुप काही ऐकले आहे. आता मी येथे खेळण्यासाठी फार काळ वाट पाहू शकत नाही. रोहितने गुजरातमधील अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर क्रिकेट खेळण्याची इच्छा दर्शवली आहे.
 
24 फेब्रुवारीला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या मैदानाचे उद्घाटन करतील. गुजरातच्या या मैदानात 1 लाख 10 हजार प्रक्षक बसू शकता अर्थातच याची क्षमता मेलबर्न क्रिकेट मैदानापेक्षा अधिक आहे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख TikTok वर आता आई-वडिलांची नजर