पुणे- मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलो. यावेळी त्याने मला माझ खेळ असाच ठेवण्याचा सल्ला देण्याबरोबरच माझी जागा तुला घयाची असल्याचे सांगितले, असे गुपित भारतीय कसोटी क्रिकेट संघातील खेळाडू अजिंक्य रहाणे याने उलगडले.
मनातील स्वप्नांचा पाठलाग कसा करावा, सुनियोजित कष्ट म्हणजे नेमके काय, यश- अपयशात अडकून न राहता पुढील प्रवासावर लक्ष केंद्रित कसे करावे, यावर क्रीडा पत्रकार सुनंदम लेले यांनी अजिंक्य रहाणेसोबत गप्पा मारून त्याच्या यशाचे रहस्य उलगडले. यावेळी बोलताना अजिंक्य म्हणाला, संघासाठी सर्वोत्तम देण्याचा नेहमी प्रयत्न करतो.
मैदानात उतरण्यापूर्वी मानसिक सक्षम असणे गरजेचे आहे. मला स्लेजिंग करायला आवडत नसून, फलंदाजी उत्तर देतो. संघामध्ये जो चांगला खेळतो त्याला सगळ्यांच्या पाठिंबा असतो.