Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन सरकारच्या पाठीशी

सचिन सरकारच्या पाठीशी
मारूती 800 पासून दोन कोटी 62 लाखांच्या बीएमडब्ल्यु 8 हायब्रीडपर्यत सर्व प्रकाराच्या गाड्यांचा मालक असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आता सरकारच्या 2030 पर्यत सर्व गाड्या इलेक्ट्रिक करण्याच्या स्वप्नाच्या पाठीशी उभा राहिला आहे. 
 
पृथ्वीची काळजी घेऊन ती चांगल्या अवस्थेत पुढच्या पिढीपर्यत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे, असे तो म्हणाला. भारतातल्या सर्व गाड्या 2030 पर्यत इलेक्ट्रि कार करण्याचे केंद्र सरकाराचे उद्धिष्ट आहे. सरकारचा हा प्रयत्न योग्य दिशेने होत असल्याचे तो म्हणाला. वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन व्यवस्थेबाबातचे आपले मत तो मांडत होता. आपल्या 8 हायब्रीड या इलेक्ट्रिक गाडीचा अनुभव सुखद असल्याचेही त्याने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हिनसवर भरपाईचा दावा