Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Shardul Thakur and Mittali Parulkar: शार्दुल ठाकूर लवकरच लग्नबंधनात अडकणार

webdunia
, सोमवार, 19 डिसेंबर 2022 (17:04 IST)
भारतीय वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर अजूनही भारतीय संघासोबत बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, परंतु यादरम्यान तो 27 फेब्रुवारी रोजी त्याची मंगेतर मिताली परुलकर, बँकिंग स्टार्टअपची संस्थापक, हिच्याशी लग्नगाठ बांधणार आहे. त्याची मंगेतर मिताली परुलकर हिने या तारखेला दुजोरा दिला आहे. शार्दुलने गेल्या वर्षी 29 नोव्हेंबरला मितालीशी साखरपूडा केला होता. वृत्तानुसार, मितालीने सांगितले की, हा सोहळा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शार्दुलचे शेड्युल खूप बिझी आहे. 24 फेब्रुवारीला तो सामना खेळणार आहे. यानंतर 25 फेब्रुवारीपासून ते लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. ज्यामध्ये सुमारे 200 ते 250 पाहुणे सहभागी होणार आहेत. हा सोहळा मुंबईत होणार आहे. दोघांच्या लग्नासाठी डिझायनर्स फायनल झाले आहेत. आणि ती स्वतः तिच्या लग्नाचा केक बनवेल. 
 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तान्ह्या बाळाला घेऊन आमदार सरोज अहिरे विधिमंडळात; चर्चा तर होणारच