तेव्हा सुशांतशी बोललो नाही याची खंत शोएब अख्तरने सांगितला किस्सा

सोमवार, 29 जून 2020 (15:30 IST)
बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याची महेंद्रसिंग धोनीच्या चरित्रपटातील भूमिका सर्वाधिक गाजली.

धोनीच्या चित्रीकरणादरम्यान पाकिस्तानचा शोएब अख्तर मुंबईत होता. त्यावेळचा एक किस्सा त्याने आपल्या यू-ट्यूब चॅनेलवर सांगितला असून मुंबईत असताना समोर पाहूनही आपण त्याला न बोलल्याची आपल्याला खंत वाटते असे अख्तर म्हणाला. शोएब म्हणाला, 2016 साली मी मुंबईतल्या ऑलिव्ह हॉटेलमध्ये सुशांतला भेटलो होतो. त्यावेळी माझ्याशी बोलण्याचे त्याचे धाडस झाले नाही. तो माझ्या बाजूने डोके खालच्या दिशेला करून निघून गेला. त्यानंतर माझ्या एका मित्राने मला सांगितले की हा अभिनेता धोनीची भूमिका करणार आहे. त्यावेळी मला उत्सुकता होती की त्याने धोनीची भूमिका कशी निभावली आहे ते पाहूया. धोनी चित्रपट हिट झाला, पण मुंबईतील त्या भेटीच्या वेळीमी त्याला थांबवून त्याच्याशी काहीच बोललो नाही याची मला खंत आहे. मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्याला सांगितले असते. कदाचित ते अनुभव ऐकून त्याल त्याच्या जीवनात थोडा फायदा झाला असता. पण तसे घडलेच नाही. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज