Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शोएब अख्तरची मागणी : मोदींनी धोनीला फोन करुन विश्वचषक खेळायची विनंती करावी

शोएब अख्तरची मागणी : मोदींनी धोनीला फोन करुन विश्वचषक खेळायची विनंती करावी
रावळपिंडी , बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (17:46 IST)
महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानी संघाचा माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही धोनीच्या निवृत्तीबद्दल आपले मत मांडले असून त्याच्या मते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला फोन करुन टी-20 विश्वचषकात खेळण्याची विनंती करावी.
 
अख्तर म्हणाला, धोनीने टी-20 क्रिकेट खेळत रहाला हवे होते. टी-20 विश्वचषकानंतर तो निवृत्त होऊ शकला असता, पण निवृत्ती घेणे हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. पण त्याने  सगळे काही साध्य केले आहे. रांची सारख्या शहरातून आलेला मुलगा भारतीय संघाचा कर्णधार होईल, असा कोणीही विचार केला नव्हता. सरतेशेवटी जगाने तुम्ही केलेली कामगिरी लक्षात ठेवावी, असे प्रत्येक खेळाडूला वाटत असते आणि भारतासारख्या देशात तर खेळाडूंना का सन्मान दिला जातो. धोनीलाही तो कायम मिळत राहील. कोणी सांगावे, भारताचे पंतप्रधान धोनीला फोन करुन टी-20 विश्वचषक खेळण्याची विनंती करु शकतात. पुढचा टी-20 विश्वचषक हा भारतात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्याला ही स्पर्धा खेळण्याची विनंती करावी. पंतप्रधानांच्या विनंतीला कोणीही नाही म्हणत नाही. शोएब अख्तर एका यू-ट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.
 
1987 साली जनरल झिया उल-हक यांनी फोन करुन इ्रमान खान यांना क्रिकेट सोडू नको, असे सांगितले होते. इ्रमान खान यांनीही त्यांचा मान राखत पुढची काही वर्षे क्रिकेट खेळणे पसंत केले. त्यामुळे मोदींनी विनंती केल्यास धोनी कदाचित टी-20 विश्वचषकात खेळेल, असेही शोएब म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जागतिक छायाचित्रण दिन : जगाचं लक्ष वेधून घेणारी ही सात छायाचित्रं तुम्ही पाहिली आहेत का?