rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शुभमन गिलने एकाच मालिकेत 700 हुन अधिक धावा करून इतिहास रचला

Shubman Gill
, सोमवार, 28 जुलै 2025 (10:35 IST)
शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यावर खूप चांगली कामगिरी करत चौथ्या कसोटी सामन्यातही शतक झळकावले आहे, जे सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील त्याचे चौथे शतक आहे.
शुभमन गिलने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत आतापर्यंत एकूण715 धावा केल्या आहेत. यासह, तो कसोटी मालिकेत 700+ धावा करणारा दुसरा भारतीय कर्णधार बनला आहे.
ALSO READ: 2025 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान स्पर्धा करणार हे संघ सहभागी होणार
त्याच्या आधी सुनील गावस्कर यांनी 1978/79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत732 धावा केल्या होत्या. गावस्कर आणि गिल व्यतिरिक्त, इतर कोणत्याही भारतीय कर्णधाराला कसोटी मालिकेत 700+ धावा करता आलेल्या नाहीत.
कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम डॉन ब्रॅडमन आणि सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. ब्रॅडमन यांनी 1947/48 च्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार शतके आणि गावस्कर यांनी 1978/79 च्या कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरुद्ध चार शतके ठोकली. आता शुभमन गिलने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत चार शतके ठोकली आहेत आणि या दोन्ही दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा चायना ओपन मध्ये उपांत्य फेरीत पराभव