Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मिथ-वॉर्नर यांचे राजीनामे ; पेन कर्णधार

स्मिथ-वॉर्नर यांचे राजीनामे ; पेन कर्णधार
सिडनी , सोमवार, 26 मार्च 2018 (13:06 IST)
कर्णधार स्टीव्ह स्मिथने चेंडूशी छेडछाड केल्याची कबुली दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटमध्ये वादळ निर्माण झाले. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर यांनी आपापले राजीनमे दिले आहेत.
 
क्रिकेट ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलिया सरकारने आदेश दिल्यानंतर काही वेळातच स्मिथ कर्णधारपदावरून पाउतार झाला. त्यामुळे यष्टिरक्षक फलंदाज टीम पेन याच्याकडे ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. स्मिथने कर्णधारपदाचा व वॉर्नरनेही उपकर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलिाचे प्रमुख जेम्स सुदेरलँड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.
 
केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरी क्रिकेट कसोटी खेळली जात आहे. तिसर्‍या दिवशी ऑस्ट्रेलियाचे क्षेत्ररक्षण सुरू होते. दक्षिण आफ्रिकेच्या दुसर्‍या डावातील 43 व षटकामध्ये ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर बॅनक्रॉफ्ट हा चेंडूशी छेडछाड करीत असल्याचे पंचांच्या लक्षात आले. त्याने खिशातून पिवळ्या रंगाचे कापड काढले व तो चेंडूच्या खडबडीत भागावर कापड घासत होता. त्यानंतर त्याने ते कापड पँटच खिशात लपविले.
 
चेंडूला स्विंग मिळावी म्हणून त्याचा हा प्रयत्न होता. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहन यांच्या सांगण्यावरून राखीव खेळाडू पीटर हॅण्डस्कोम्बने ही बाब पंचाच निदर्शनास आणून दिली. पंच निगेल लाँग आणि रिचर्ड यांनी बॅनक्रॉफ्टशी चर्चा केली. पंचांनी चेंडू बदलला नाही किंवा ऑस्ट्रेलियास पाच धावांचा दंड केला नाही.
 
2002 मध्ये वकार युनूसने आणि 2016 मध्ये फाफ डू प्लेसीने अशी चूक केली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात बॅनक्रॉफ्टने माझ्या सांगणवरून चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनीतीचाच भाग म्हणून केली अशी स्वतःहून कबुली दिली.
 
टेलिव्हिजनने या सर्व प्रकाराचे चित्रण केले आहे. या प्रकरणामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली आणि त्यांच्यावर क्रिकेट जगतातून टीकेचा भडीमार सुरू झाला.
 
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने हे प्रकरण गंभीरपणे घेतले. सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियास स्टीव्ह स्मिथ कर्णधारपदाचा राजीनामा त्वरित घ्यावा, असा आदेश दिला. स्मिथ आणि बॅनक्रॉफ्ट यांनी कसोटी सामनचा तिसर्‍या दिवशीचा खेळ संपल्यानंतर पत्रकार परिषदेत चेंडूशी छेडछाड करून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहर करण्याचा  आमचा प्रयत्न होता, असे सांगितले. सरकारचा आदेश मिळाल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथला कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास सांगितले.
 
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी ही घटना आश्चर्यकारक व निराशा करणारी आहे. सकाळी दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या वृत्तामुळे आम्ही सर्वच निराश झालो आहोत. एखादा खोटारडेपणामध्ये आमच्या संघाचा समावेश असेल यावर विश्वास बसत नाही. संपूर्ण देशासाठी ही लाजीरवाणी बाब आहे. टर्नबुल यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अध्क्षासोबत चर्चा केली आणि या कृतीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
 
ऑस्ट्रेलिन स्पोर्टस्‌ कमिशनने कर्णधारासह संपूर्ण संघाच्या विरोधात कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पाकच्या प्रत्येक गोळीला बॉम्बने उत्तर हाच पर्याय : शहा