सुरेश रैना रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला

मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (17:10 IST)

भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना एका रस्ते अपघातातून थोडक्यात बचावला आहे. गाझीयाबादवरुन कानपूरच्या दिशेने जाताना सुरेश रैनाच्या रेंज रोवर गाडीचा टायर अचानक फुटला. स्थानिक पोलिसांनी या घडलेल्या अपघाताबद्दल माहिती दिली. इटावा शहरातील फ्रेंड्स कॉलनी परिसरात हा अपघात घडला. यावेळी रैनाच्या गाडीचा वेग हा नियंत्रणात असल्याने तो या अपघातातून बचावला. 

रैना सध्या दुलीप करंडकात इंडिया ब्लू संघाचं कर्णधारपद भूषवतो आहे. बुधवारी या स्पर्धेत रैनाला भाग घ्यायचा आहे. यासाठीच रैना गाडीने कानपूरच्या दिशेने निघाला होता. 

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख भगवान गडा दसरा मेळावा: पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा नकार