Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा

नवा विक्रम १६७ चेंडूत ५५ चौकार आणि ५२ षटकार तब्बल ५८५ धावा
, शनिवार, 7 डिसेंबर 2019 (16:23 IST)
भारताच्या एक शाळेतील विद्यार्थ्याने क्रिकेटमध्ये अप्रतीम असे प्रदर्शन घडवत संपूर्ण देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. गाझियाबाद येथील या विद्यार्थ्याने शहीद राम प्रसाद विस्मिल स्मृती क्रिकेट सामन्यात तब्बल ५८५ केल्या. विशेष म्हणजे त्याने आपल्या खेळी दरम्यान ५५ चौकार आणि ५२ षटकार १६७ चेंडूत केल्या आहेत. स्वास्तिक चिकारा असं या विद्यार्थ्याचे नाव आहे.
 
माही क्रिकेट अकादमीच्या वतीनं एसीई क्रिकेट अकादमी विरुद्ध खेळताना स्वास्तिकनं ही धावसंख्या उभारली आहे. स्वास्तिकच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर माही अकादमीनं एसीई अकादमीचा ३५५ धावांनी पराभव केला.
 
गाझीयाबादच्या दीवान क्रिकेट स्टेडिअयमध्ये हा सामना खेळवण्यात आला. पहिल्या भागीदारीत स्वास्तिकने प्रीतसोबत पहिल्या विकेटसाठी ५२७ धावांची भागीदारी केली. यामध्ये प्रीतने ४८ धावा केल्या. तर स्वास्तिकने १६७ चेंडूत ५८५ धावा करत तुफानी फलंदाजी केली.
 
स्वास्तिकच्या या तुफानी खेळामुळे संघाने ३८.२ षटकात ७०४ धावांचा डोंगर रचला. ACE चा गोलंदाज सोनूने ७७ धावांवर ४  विकेट घेतले. लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ACE संघाने ४० षटकात ७ विकेट घेत ३४९ धावा बनवल्या.
 
यापूर्वीही स्वास्तिक आपल्या तुफानी खेळीमुळे चर्चेत राहीला आहे. शालेय क्रिकेटमध्ये यापूर्वीही त्याने सर्वाधिक ३५६ धावा करत विक्रम रचला होता. आतापर्यंत त्याने २२ द्विशतक आणि ७ त्रिशतक केले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत भरधाव कार तरुणीच्या जीवाशी 23 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू