Publish Date: Tue, 17 Aug 2021 (11:36 IST)
Updated Date: Tue, 17 Aug 2021 (11:39 IST)
आयसीसीने या वर्षी होणाऱ्या टी -20 विश्वचषकाचे वेळापत्रक मंगळवारी जाहीर केले आहे. कोरोना विषाणूमुळे, भारतात होणारी ही स्पर्धा आता ओमान आणि यूएईमध्ये आयोजित केली जात आहे. टी 20 विश्वचषक 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
जेतेपदाचा सामना 14 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल. भारत 24 ऑक्टोबरपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. त्याचा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. सुपर 12 चे सामने 23 ऑक्टोबरपासून सुरू होतील. यापूर्वी, पहिल्या फेरीचे सामने 17 ऑक्टोबरपासून खेळले जातील.
webdunia
Publish Date: Tue, 17 Aug 2021 (11:36 IST)
Updated Date: Tue, 17 Aug 2021 (11:39 IST)