Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
शनिवार, 21 दिसंबर 2024
webdunia

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा,एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांचा समावेश

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा,एकदिवसीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावांचा समावेश
, शुक्रवार, 19 जुलै 2024 (08:29 IST)
भारत आणि श्रीलंका यांच्यात टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. बीसीसीआयने दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमध्ये प्रथम टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. जे 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे. एकदिवसीय मालिका 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान आयोजित केली जाईल.

T20 संघात भारतीय संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादवच्या हातात आहे. संघाची उपकर्णधारपदाची धुरा शुभमन गिलच्या हाती आहे.शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची दमदार कामगिरी आणि वरिष्ठ खेळाडूंचे संघात पुनरागमन झाल्यानंतर बीसीसीआयने त्याला उपकर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या नावांचा समावेश आहे. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर हे दोन्ही खेळाडू विश्रांतीवर होते.श्रेयस अय्यरचे वनडे संघात पुनरागमन झाले आहे. 
 
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ
T20 संघ :  सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज
 
एकदिवसीय संघ :  रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रायन पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा
Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतानंतर, मॉरिशसमध्ये पहिले परदेशी जन औषधी केंद्र उघडले