भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 12 मार्चला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी चिंता वाढविणारी बातमी समोर आली आहे. एका वृत्तानुसार टी-20 मालिकेसाठी निवडलेला फिरकीपटू वरूण चक्रवतीने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. त्यामुळे तो जर फिटनेस टेस्ट उत्तीर्ण होऊ शकला नाही तर त्याला या मालिकेतून बाहेर केले जाऊ शकते. 29 वर्षीय गोलंदाज चक्रवर्ती ऑस्ट्रेलिया दौर्यातसाठीही टी-20 संघात निवडला गेला होता. मात्र, पूर्णपणे तो तंदुरूस्त नसल्याने नंतर त्याच्या जागी टी नटराजनला संघात सामील करावे लागले होते. आता पुन्हा एकदा तो इंग्लंडविरूध्दच्या टी-20 मालिकेसाठी संघात निवडण्यात आला आहे. मात्र त्याने आतापर्यंत यो-यो टेस्ट पास केलेली नाही. याबाबत चक्रवर्तीने माध्यमांशी बोलताना सांगितले की, मला आतापर्यंत याविषयी कोणतीही माहिती दिली गेली नाही. भारतीय क्रिकेट संघात निवडल्यानंतर प्रथम यो-यो टेस्ट उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. या टेस्टमध्ये खेळाडूला 8.5 मिनिटात 2 किलोमीटर धावावे लागते किंवा आपला स्कोर 17.1 असा ठेवावा लागतो. वरूण चक्रवर्ती सध्या मुंबईत आयपीएलचा संघ कोलकाता नाइट राडर्ससोबत सराव करत आहे.
वरूणने तामीळनाडूसाठी 1 प्रथमश्रेणी सामना खेळला आहे. मात्र, तो विजय हजारे ट्रॉफीत संघाचा सदस्य नाही. तमिळनाडूच्या सिलेक्टरने वरूणविषयी सांगितले की, आम्ही त्याला टी-20 चा स्पेशालिस्ट खेळाडू मानतो. त्याच्याकडून चार किंवा पाच षटकांपेक्षा जास्त फलंदाजीची अपेक्षा ठेवली गेली नाही पाहिजे. कारण त्याच्या बोटांवर खूप दबाव असतो.