आयसीसी टी -20 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना गटात रंगणार आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सुपर 12 च्या गट -2 मध्ये भारत आणि पाकिस्तानला एकत्र ठेवले आहे. सुपर 12 मध्ये दोन गट आहेत, ज्यामध्ये सहा संघ ठेवण्यात आले आहेत. गट -2 मध्ये भारतासह पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, गट-ए उपविजेता, गट-बी चँपियन संघ असेल तर गट -1 मध्ये इंग्लंड,ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, गट-ए उपविजेता असणार.गट बी विजयी संघ असेल. गट अ मध्ये श्रीलंका,आयर्लंड, नीदरलँड्स आणि नामीबिया संघ आहे, तर ब गटात बांगलादेश, स्कॉटलंड, पपुना न्यू गिनी आणि ओमान आहेत.
यावेळी श्रीलंका,बांगलादेश सारख्या संघांनाही टी -20 विश्वचषकात थेट पात्रता मिळवता आले नाही. सुपर -12 साठी पात्र होण्यासाठी श्रीलंका आणि बांगलादेशला आपापल्या गटात विजेते किंवा उपविजेतेपदावर रहावे लागेल. 20 मार्च 2021 च्या रँकिंगच्या आधारे या गटाची निवड झाली आहे. टी -20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि ओमान येथे खेळला जाणार आहे. पूर्वी हे टी -20 विश्वचषक भारतात खेळले जाणार होते, परंतु कोविड -19 साथीच्या रोगामुळे तो युएईमध्ये करवावे लागले.या स्पर्धेचे होस्टिंग करण्याची जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) असेल.
बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले की, “टी -20 विश्वचषक स्पर्धेचे काऊंटडाऊन गटाच्या घोषणेनंतर सुरु झाले आहे. दोन्ही गटांचे सामने खूप रंजक असतील. मी यापूर्वी असे म्हटले आहे की टी -20 हे फॉर्मेट आश्चर्यकारकतेने भरलेले आहे आणि आम्ही त्यासाठी प्रतीक्षा केली पाहिजे. मला खात्री आहे की आम्हाला काही अतिशय रोमांचक सामने पाहायला मिळतील.
तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, टी -20 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करून ओमानला विश्व क्रिकेटमध्ये आणणे चांगले झाले.यामुळे युवा क्रिकेटपटूंना खेळामध्ये रस घेण्यात मदत होईल.